प्रवासी विद्यार्थ्यांनी या गाड्यांची मागणी आगाराकडे केली होती यानुसार गडिंग्लज आगाराने धामणे गावासाठी आजरा आगाराने वझरे गावासाठी आणि गोवा परिवहन मंडळाने संत श्री बाळूमामा भक्तासाठी पणजी कोल्हापूर व्हाया आमदापूर मार्गे बस सुरु केली आहे. या गाडीमुळे खेड्यातील आणि गोवा व कोल्हापूर येथील नागरिकांची सोय झाली आहे. गडहिंग्लज आगाराने दुपारी तीन वाजता गडहिंग्लज- धामणे ही बस सुरू केली आहे दुपारी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे सोय झाली आहे. आजरा आगाराने सकाळी साडेनऊ वाजता गडहिंग्लज- वझरे ही बस सुरू केली आहे. गोवा परिवहन महामंडळाने गोवा व कोकण विभागातील प्रवाश्याकरी व संत बाळूमामा भक्तासाठी नवीन बसलेली सुरु केली आहे
पणजी - कोल्हापूर गाडी सावंतवाडी - आजरा उत्तूर -आमदापूर -निढोरी -कागल- कोल्हापूर अशी बस फेरी होईल. पणजीहून ही बस दुपारी ४. १५ ला आणि कोल्हापूरहून पहाटे पाच-पंधराला सुटेल बस मुळे आमदापूर गारगोटी येथील प्रवाशांना गाड्या न बदलता थेट प्रवास करता येणार आहे .