उत्तूरला मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा ६१ वा स्मृतिदिन ‘आध्यात्मिक ज्ञान दिवस’ म्हणून साजरा.
उत्तूर ता.२४ (अशोक तोरस्कर)
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रथम मुख्य प्रशासिका मातेश्वरी जगदंबा सरस्वती (ओम राधे) यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त २४ जून रोजी देश-विदेशातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रांवर ‘आध्यात्मिक ज्ञान दिवस’ म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा जन्म सन १९१९ मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. बालपणी त्यांना ‘ओम राधे’ या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या मुखातून उच्चारल्या जाणाऱ्या ‘ओम’ या शब्दामुळे परिसरात शांततेची अनुभूती निर्माण होत असे. त्यामुळे त्या ‘ओम राधे’ या नावाने सर्वत्र लोकप्रिय झाल्या.
२४ जून १९६५ रोजी त्यांनी आपला नश्वर देह त्यागून संपूर्णत्वाची प्राप्ती केली. त्यानिमित्त हा दिवस ब्रह्माकुमारीज् परिवारात ‘आध्यात्मिक ज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
मातेश्वरी जगदंबा यांचे व्यक्तिमत्त्व संपूर्ण नारी समाजासाठी प्रेरणादायी होते. ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नव्हती, त्या काळात त्यांनी आध्यात्मिक शक्तीच्या बळावर मानवसेवेचा मार्ग स्वीकारला. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले त्याग, समर्पण आणि सेवा आजही प्रेरणादायी ठरत आहेत.
त्यांनी आपल्या तपस्या, त्याग आणि सेवेद्वारे मानव समाजाला जीवनमुक्तीचा मार्ग दाखविला. दादी प्रकाशमणी, दादी जानकी, दादी हृदयमोहिनी तसेच इतर वरिष्ठ बहिणींनी त्यांच्या सान्निध्यात राहून मानवसेवेचे संस्कार आत्मसात केले. या महान आत्म्यांनी भारतीय संस्कृती व आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश जगातील १४० हून अधिक देशांपर्यंत पोहोचविला.
आधुनिक युगातील चैतन्यदेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातेश्वरी जगदंबा यांना ईश्वरीय ज्ञान, गुण आणि शक्तींचा दिव्य अनुभव लोकांपर्यंत पोहोचविण्याचे वरदान लाभले होते. त्यांच्या आदर्श मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन ब्रह्माकुमारीज् संस्था आजही विश्वशांती, मानवी मूल्ये आणि आध्यात्मिक जागृतीसाठी कार्यरत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम हे त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक सेवाकेंद्र ............................ येथे या दिवशी विशेष योगाभ्यास आणि प्रवचनाचे आयोजन केले असल्याची माहिती स्थानिक सेवाकेंद्र उत्तूर(ताआजरा)जि. कोल्हापूर. व संचालिका बी के मनिषा संचालिका ब्रह्माकुमारी यांनी दिली आहे.
*✍️ ब्रह्माकुमारीज बीके महामीडिया मराठी वृत्तसेवा*
www.bkmahamedia.com
-----------
अशोक तोरस्कर, उत्तूर