Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

धामणे येथे चाळीस गव्यानी घातला ऊसात धुडगूस.

Location: **उत्तूर ** | Published: **May 5, 2026**

धामणे येथे चाळीस गव्यानी घातला ऊसात धुडगूस.

धामणे येथे चाळीस गव्यानी घातला ऊसात धुडगूस.
उत्तूर ता.३०
धामणे (ता.आजरा) येथे गव्याच्या कळपाने रात्री ऊस पिकांत धुडगूस घालून नुकसान केले. सुमारे चाळीस गवे एकत्र कळपाने पिकांत उतरले. रात्री पिकांची राखण करण्यासाठी गेलेल्या शेत-यानी त्यांचे व्हिडिओ चित्रण करुन सोशल मिडिया वर टाकून गावातील इतर शेतकऱ्यांना सावध केले . वनविभागाने जंगली प्राण्यांचा व गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या गावाला लागून जंगल क्षेत्र आहे गवे ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागताच या परिसराकडे येत आहेत.
गावाला लागूनच चिकोत्रा नदी आहे.या नदीला बारमाही पाणी उपलब्ध असते. पाणी पिण्यासाठी गवे व जंगली प्राणी नदीकाठी येतात. पुन्हा परत जात असताना शेतातील ऊस पिकांचे नुकसान करतात.
या परिसरातील शेतक-यांना या प्राण्यांनी हैराण करून सोडले आहे.नदी व विहिरींच्या पाण्यावर ऊस, गहू, शाळू, मका अशी उन्हाळी पिके घेतली जातात. परिसरात सलग पाच वर्षे गव्यांच्या कळपांचे वास्तव्य वाढू लागले आहे. बुधवारी रात्री येथे गव्यांचा कळप दाखल झाला आहे. साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात धुडगूस घातला. पुंडलिक धामणकर,सचीन राजाराम,साताप्पा भोसले, विकास लोखंडे, चंद्रकांत गिलबिले आदींच्या शेतातील पिके खाऊन नुकसान केले आहे.
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या पिकांचे गव्यांनी नुकसान केल्याने धामणेतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व गव्यांचा बंदोबस्त करावा.
सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्य,धामणे.
---------
धामणे - पुंडलिक धामणकर यांच्या शेतात चाळीस गव्याचा कळप उतरल्याने झालेले नुकसान.
-----------
अशोक तोरस्कर उत्तूर