Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

उत्तूरमध्ये बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न.

Location: **उत्तूर ** | Published: **April 20, 2026**

उत्तूरमध्ये बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न.

उत्तूरमध्ये बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न.
उत्तूर ता.२०
उत्तूर येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीचे पूजन सर्व समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वर जीवन चरित्र अभ्यासक प्राचार्य कल्याणराव पुजारी ,गडहिंग्लज यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समाजाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून सदानंद देवरू गुरुजी यांचा सत्कार संपन्न करण्यात आला. बसवेश्वर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान गटात मनीष आमणगी, बालाजी देवरु, अन्वीशा सन्ने व प्रजना तौकरी यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला . मोठ्या गटात आरोही देवरू, स्वरा देवरु ,आराध्या आमनगी यांचे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला. खुल्या गटात अर्चना आमनगी यांनी क्रमांक पटकाविले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाबुराव पाटील व राजकुमार राठोड यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी समाजाचे अध्यक्ष प्रकाश तौकरी, उपाध्यक्ष शैलेंद्र आमणगी, सरपंच किरण आमणगी ,महेश करंबळी, बाळासाहेब मुरगुडे, शिवलिंग सन्ने, नंदकुमार आमणगी, संतोष आमणगी ,दीपक आमणगी, राजू कोनकेरी, राजेंद्र देवरु! संतोष ढबू ,सुनील आमनगी ,सागर सन्ने, प्रकाश आमणगी, सुरेश आमणगी, सुरेश वाडेकर ,मीनाक्षी तौकरी, हेमा सन्ने, सुलक्षणा कोनकेरी, वेदांती करंबळी, प्रीती देवरू, सुनिता स्वामी, मालुताई आमणगी यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.
फोटो.
उत्तूर -सदानंद देवरू (गुरुजी)यांचा सत्कार करताना प्राचार्य कल्याणराव पुजारी .
सोबत इतर मान्यवर.
----------
अशोक तोरस्कर, उत्तूर