सहा धरणग्रस्तांची निर्दोष मुक्तता.
उत्तूर .....
आंबेओहळ प्रकल्पातील धरणग्रस्त सचीन पावले, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांच्यासह सहा आरोपींची गडहिंग्लजचे सत्र न्यायाधीश माधव शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली. याबाबत हकिकत अशी डिसेंबर २०२० मध्ये आंबेओहळ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात होते. आधी पुनर्वसन करा मगच घळभरणी करा असा धरणग्रस्तांचा आग्रह होता.मात्र शासनाने प्रकल्पाचे काम सुरुच ठेवले होते. या कामांला विरोध करण्यासाठी आरदाळ येथील सहा धरणग्रस्त प्रकल्पस्थळावर गेले होते. याठिकाणी आपल्यावर धरणग्रस्तांनी राॅकेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद तत्कालीन जलअभियंता दिनेश खट्टे यानी पोलीसात दाखल केली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरिक्षक बालाजी भांगे यांनी केला. पोलिसांनी सहाजणांवर भादविस३०७,३९५,१४९,३५३,३४ प्रमाणे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवले . सरकार पक्षातर्फे श्री .खट्टे यांचा चालक रमेश परीट, तत्कालीन वैद्यकिय अधिकारी व अन्य साक्षीदार तपासणेत आले. आरोपींच्या वतीने अॕड. संजय पोवार यांनी काम पाहिले.न्यायमुर्ती माधव शिंदे यांनी सहा जणांची निर्दोष मुक्तता केली.
-----------
अशोक तोरस्कर,उत्तूर