अनुश्री परीट ,राजविर पाटील,"मिशन अंकुर" परिक्षेत प्रथम.
उत्तूर ता.२६
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली आणि २ री च्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अभियानांतर्गत घेतलेल्या " मिशन अंकुर" परिक्षेत १ली मध्ये अनुश्री रविंन्द्र परीट हिने १००पैकी९८गुण (घागरवाडी) व २री मध्ये
राजविर दिलीप पाटील यांने १००पैकी९६गुण मिळवून महागोंड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. या केंद्रांतर्गत करपेवाडी वझरे ,होन्याळी, चिमणे ,वडकशिवाले महागोंड ,घागरवाडी, हालेवाडी या शाळेतील १ली तील २६ व २री तील२९विद्यार्थी परिक्षेला बसले होते.
दोन्ही परिक्षेतील गुणानुक्रमे विद्यार्थी पुढिलप्रमाणे कंसात १००पैकी प्राप्त गुण , इयत्ता १ली ; अनघा अस्वले -चिमणे (९४), तन्मय मांडे- कर्पेवाडी (९४),भुमी सातपुते -चिमणे (९२).
इयत्ता२री ;निवेदिता बरगे - महागोंड(९४), ईश्वर कांबळे -वडकशिवाले(९२)
केंद्रप्रमुख मारुती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिक्षा झाल्या.
फोटो.
अनुश्री परिट.
राजविर पाटील.
---------
अशोक तोरस्कर,उत्तूर