Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

धामणेतील शेतक-यांनी केला स्वखर्चाने शेतरस्ता.

Location: **उत्तूर ** | Published: **March 16, 2026**

धामणेतील शेतक-यांनी केला स्वखर्चाने शेतरस्ता.

धामणेतील शेतक-यांनी केला स्वखर्चाने शेतरस्ता.
उत्तूर ता.१६
धामणे (ता.आजरा) येथील शेतक-यानी
अनिल शिंदे ते तुकाराम पोवार यांच्या शेतापर्यंतचा एक किलो मिटरचा रस्ता स्वखर्चाने तयार केलाआहे. यासाठी
शेतकऱ्यांनी लोकवर्गणी काढली व सर्वांनी मिळून श्रमदान केले.
या प्रयत्नांमुळे शेतातील मालाची वाहतूक करण्यासाठी सुलभ होणार आहे. शेती उपयोगी अवजारे नेण्यातील अडथळे दूर होणार आहेत . उर्वरित रस्ता शासकीय यंत्रणेमार्फत रोजगार हमीतून हा रस्ता केल्यास दीडशे एकर बागायती क्षेत्र होणार आहे .रस्त्या अभावी या परिसरातील जमिनी कसणे शेतक-यानी सोडून दिले आहे.त्या पिकाखाली येतील. हा रस्त्या होण्यासाठी संतोष जाधव, तुकाराम पवार, प्रकाश मगदूम, आनंदा मांडे, प्रकाश अस्वले, यांनी प्रयत्न केले. ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत, यांनी या रस्त्याची पाहणी करून उर्वरित रस्त्यासाठी पाठ पुरावा करण्याचे सांगितले. संदीप पवार या परिसरात पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करुन या परिसरातील शेती बागायत होण्यासाठी
मदत करणार असल्याचे सांगितले.
फोटो.
धामणे -शेतक-यानी स्वखर्चाने तयार केलेला शेतरस्ता.
-----------
अशोक तोरस्कर, उत्तूर