*वडकशिवाले उपसरपंचपदी अमर पाटील*
-------------------
वडकशिवाले (ता. आजरा ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमर निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच कु.मयुरी कांबळे होत्या.
तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आठ पैकी सात जागा जिंकल्या होत्या. दरवर्षी उपसरपंचपदी संधी देण्याचा निर्णय गट प्रमुखांनी घेतला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे उपसरपंच नितीन सावंत यांनी राजीनामा दिला.पाटील यांचा या वेळी अंबाजी दिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सुनील दिवटे, शशिकांत लोखंडे, जयवंत शिंदे, दत्ताराम कसलकर, रामचंद्र पाटील, श्रीपती पाटील,शालन कांबळे, वच्छला कसलकर, रतन काळे,अशोक लोखंडे विश्वास काळे हे उपस्थित होते. आभार ग्रामसेवक सावंत यांनी मानले.