जोमकाई मंदिर परिसर स्वच्छता: ३० वर्षांचा उपक्रम
उत्तूर ता.५
येथील उत्तूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी जोमकाई देवी मंदीर परिसराची स्वच्छता केली. ३० वर्षापुर्वी कै.अनंतराव आजगावकर (सर) यांनी
येथील ग्रामदैवत जोमकाई देवीच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरातील स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरू केला. यावर्षी या उपक्रमाला विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जमवलेल्या नारळ्याच्या शेंडीपासून जिमखाना साठी गाद्या बनविणे.करवंटी पासुन पक्षासाठी घरटी तयार करून या परीसरातील झाडांना अडविणे याबाबत कलाशिक्षक इंद्रजित बंदसोडे यांनी माहिती दिली
यावेळी ग्राम स्वच्छतेबाबत व आरोग्य शिक्षणाबाबत शिक्षक तानाजी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.स्वच्छते नंतर विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी जिवन हेरेकर व देवीचे पुजारी भारती गुरव यांनी
खाऊचे वाटप केले.
यावेळी उमाराणी जाधव, कविता व्हनबट्टे , अलका शिंदे , बी. व्ही. पाटील, राजाराम केसरकर , नंदकुमार कांबळे , चिदंबर पोतदार यांनी नियोजन केले .प्राचार्य, आर . डी .महापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो.
चव्हाणवाडी - जोमकाईदेवी मंदिर परीसराची स्वच्छता करताना विद्यार्थी.
---------------
अशोक तोरस्कर,उतूर