आईच्या उत्तरकार्याला १५१ फळझाडाचे वाटप; चिमणे येथील पुत्राचा पर्यावरण रक्षणाचा संदेश.
उत्तूर ता.९
आईच्या उत्तरकार्याला १५१ फळझाडांचे वाटप करुन चिमणे ता .(आजरा) येथील टी.एस.शिंदे यांनी विधायक उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचा संदेश नागरीकांना दिला.
शिंदे यांच्या मातोश्री तायाक्का श्रीपती शिंदे यांचे वयाच्या १००वर्षी निधन झाले. दोन मुले,सात मुली, सुना,जावई,नातवंडे,पतरुंड,अश्या
आपल्या काळात त्यांनी आपली पाचवी पिढी पाहिली. त्यांना झाडे लावण्याची मोठी हौस होती.
उत्तरकार्याला पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना भांडी वाटप करण्याची प्रथा अलीकडे ग्रामीण भागात सुरू आहे.या अनाठायी खर्चाला पायबंद बसला पाहिजे, चुकीच्या प्रथा पडू नयेत व आपल्या आईची हौस यानिमित्ताने पुढे कार्यरत रहावी यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. शिंदे हे जलसंपदा विभागातील सेवा निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना ही वृक्षारोपण ची आवड आहे. यामुळे आईच्या उत्तरकार्यादिवशी भांडी वाटपाला फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत शिंदे यांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला.
फोटो.
चिमणे - आईच्या उतरकार्यात झाडे वाटप करताना टी.एस.शिंदे.
-------------
अशोक तोरस्कर,उत्तूर