Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

मुमेवाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा गौरव.

Location: **उत्तूर ** | Published: **January 7, 2026**

मुमेवाडी प्राथमिक  शाळेत विद्यार्थ्यांचा गौरव.


प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी( ता. आजरा) येथे केंद्रीय व तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाळाव्यावस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने गौरव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक गटात उत्कृष्ट खेळी करून ११ पारितोषिके मिळवले आहेत .यावेळी शाळाव्यावस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव कांबळे ,उपाध्यक्ष रामदास मोरवडकर, तंटामुक्त अध्यक्ष विजय गुरव, एकनाथ पाटील, रवींद्र कांबळे, किरण भोसले, सतीश बेलकर, रेश्मा ढोनूक्षे, सरिता नंदे, अंजना जाधव उपस्थित होते. शिक्षिका लता पाटील यांनी स्वागत केले. अमित कांबळे यांनी आभार मानले.