Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

उत्तूर विद्यालयात आनंददायी शुक्रवार संपन्न .

Location: **उत्तूर ** | Published: **January 7, 2026**

उत्तूर विद्यालयात आनंददायी शुक्रवार संपन्न .

उत्तूर विद्यालयात आनंददायी शुक्रवार संपन्न .
उत्तूर ता.५
येथील उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन वर्षातील पहिलाच आनंददायी शुक्रवार उत्साहात साजरा झाला करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघाचे विज्ञान विषयाचे चेअरमन डी. एस
लवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी. महापुरे होते.
यावेळी कविता, कथा चुटकुले निसर्ग, पर्यावरण, समाजशीलता आत्मभान आणि विद्यार्थ्यांच्या समोरचे उत्तुंग ध्येय यांच्या बद्द्ल माहिती दिली
यावेळी उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज साठी श्री लवटे यांनी १५ हजार रुपयाची ची ग्रंथ भेट देणार असल्याची घोषणा केली. यावेळी डॉक्टर"ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा" मध्ये प्रज्ञा प्राप्त झालेल्या विद्यार्थिनी वेदिका माने, श्वेता कांबळे ,ज्योती नाईक, समीक्षा आमनगी,मनस्वी पाटील. प्रतीक्षा
देसाई यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बी. व्ही. पाटील , अलका शिंदे टी. ए. कांबळे यांच्यासह शिक्षक , कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.