सांस्कृतिक स्पर्धेत उत्तूर शाळेचे यश.
उत्तूर ता.१२
शिक्षण विभाग आजरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत समूहनृत्य मध्ये कन्या विद्या मंदिर उत्तूरने प्रथम क्रमांक मिळवला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये अमृता पाटील,धनश्री कदम,वेदिका उत्तुरकर यांनी व मोठ्या गटामध्ये चिन्मयी थोरवत,भार्गवी भादवणकर व सानिका कुंभार यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाळगोंडा कोकीतकर व विलास वाईंगडे यांचे मार्गदर्शन लाभले .
फोटो.
आजरा - सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवलेला कन्या विद्यामंदिरचा संघ.
------------