Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

एका गव्याचा मृत्यू,

Location: **उत्तूर ** | Published: **December 7, 2025**

एका गव्याचा मृत्यू,

आजरा - उत्तूर रस्ता ओलांडताना उंच बांधा वरुन पडून जखमी झालेल्या गवारेड्याचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला आजरा - उत्तूर रस्त्यावरील हाॕटेल वृदांवन जवळील लोहार यांच्या शेतात ही घटना घडली आहे. घटनास्थळी गवत व शेतातील जोंधळा पिक मोडून पडला आहे. गवारेडा पडल्याची माहिती समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.वनविभाला यांची माहिती देण्यात आली.
गवा रेड्यांचा कळपाचा वावर या परिसरात आहे. चार दिवसापासून त्यानी उभ्या असलेल्या पिकांत धुडगूस घातला आहे. गव्याचा कळप रस्ता ओलांडतान जात होता. यातील एका रेड्याने उंच बांधावरुन जोराची उडी मारली एका बाजूवर पडल्याने त्याला उठता आले नाही. त्यांच्याबरोबरचा कळप निघून गेला. घसकटत पुढे जाण्याचा प्रयत्न त्याने केला मात्र त्याला जमले नाही. अडचणीच्या ठिकाणी पडल्याने त्यांच्यावर उपचार करता येईना. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी आणून त्याला पाजण्याचा प्रयत्न केला.दुपारी त्याचा मृत्यू झाला . परीक्षेत्र वनधिकारी सचीन सावंत यांनी घटनास्थळाला भेट दिली. पशुधन अधिकारी डॉ.निखील यादव यांनी घटनास्थळी भेट दिल्ली.
त्यांनी गवारेड्याचे शवविच्छेदन केले.मृत गवारेडा हा २ते ३ वर्षांचा असावा. सायंकाळी मडीलगे परिसरातील वन विभागाच्या हद्दीत मयत गवारेड्याचे दफन करण्यात आले.
चौकट.
आरदाळचे माजी उपसरपंच अमोल बांबरे यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाला मदत केली. वनखात्याला माहिती देणे, मृत गव्याला घेऊन जाण्यासाठी जे.सी.बी मशीन, ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे, इत्यादी कामे ते दिवसभर घटनास्थळी थांबून करीत होते.